नगर शहरातील मानाच्या 12 गणपती मंडळांचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय


नगर - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नगर शहरातील मानाच्या गणपती मंडळांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीस शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके, शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मनेष साठे, स्वप्नील घुले,  ऋषीकेश कावरे  आदिंसह माळीवाडा परिसरातील मानाच्या गणपती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


     याप्रसंगी बोलतांना अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्व मंदिरे बंद आहेत. त्याचबरोबर अनेक सण-समारंभही घरीच साध्या पद्धतीने साजरे झाले आहेत. आताही येणारा गणेशोत्सव हा घरोघरी व सार्वजनिक स्वरुपात साजरा होणारा असला तरी नगरमधील कोरोना विषाणुची प्रादुर्भावाची परिस्थिती पाहत सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे एक चांगला निर्णय सर्व मानाच्या गणपती मंडळाने घेतला आहे. यामुळे कोणत्याही प्रकाराचे कार्यक्रम होणार नाहीत व गर्दीही होणार नाही. पुढील वर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यावर मोठया स्वरुपात गणेशोत्सव साजरा करु. ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरातही साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात येणार असून, विसर्जन मिरवणुकही रद्द करण्यात आलेली आहे. प्रशासनास सर्वतोपरि सहकार्य करु, असे सांगितले.


     याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व मानाच्या मंडळाने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम न घेता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व मंडळांचे एकमत  झाले आहे. माळीवाडा परिसरातील सर्व मंडळांचा हा एकमुखी निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


     याप्रसंगी संभाजी कदम यांनीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता कोणताही सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


     याप्रसंगी पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके म्हणाले, नगर शहरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे येणारा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा न करता साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनास शहरातील मानाच्या गणपती मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा प्रतिसाद देत चांगला निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याप्रमाणेच नगर शहरातील व जिल्ह्यातील मंडळांनीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.


     या बैठकीस संगम तरुण मंडळाचे ऋषीकेश कावरे, माळीवाडा तरुण मंडळाचे निलेश खरपुडे, आदिनाथ तरुण मंडळाचे गणेश हुच्चे, दोस्ती मित्र मंडळाचे सुनिल जाधव, नवजवान तरुण मंडळाचे अंकुश ढुमणे, महालक्ष्मी तरुण मंडळाचे मनिष साठे, कपिलेश्‍वर मित्र मंडळाचे रविंद्र जपे, नवरत्न मित्र मंडळाचे स्वनील घुले, समझोता तरुण मंडळाचे शिवाजी कदम, निलकमल मित्र मंडळाचे बाळासाहेब बोराटे, शिवशंकरतरुण मंडळाचे विशाल भागानगरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
क्रीडा शिक्षक महाविद्यालयातील खेळाडूंना हिऱ्यांप्रमाणेपैलू पडून घडवत आहेत : ब्रिजलाल सारडा
Image
बिनकामाच्या आमदाराला लोकवर्गणीची आडचण
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
खा.डॉ.सुजय विखे यांनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट
Image