श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहू कानडे यांनी वर्षभरात एक रुपयाचे विकास कामे केली का? लोकांनी एकञ येऊन लोकवर्गणीतुन पोलिस चौकी उभारली तर लोकप्रतिनिधीचा टायगर जागा झाला लोकांनी पोलिस चौकीची मागणी केली त्यावेळी मुग गिळूण का बसले असा सवाल भाजप भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस दताञय खेमनर यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात खेमनर यांनी म्हटले आहे की, देशात कोरोनाचे संकट वाढत असताना श्रीरामपूर तालुक्यात आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून महसूल, पोलीस प्रशासन कोरोना संक्रमण वाढू नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असो चोवीस तास पोलीस जनतेची काळजी घेत आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या भागात पोलीस चौकी उभारण्याचे चांगले काम पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले आहे. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारी मार्गावर लक्ष केंद्रीत करुन गुन्हेगारीला आळा घालता येईल.
पेपरबाजी करु न केलेल्या विकास कामाचा डंका पिटवणाऱ्या लोकप्रतिनिला लोकवर्गणीतील चांगल्या कामाचा झटका आलेला दिसतोय. त्यामुळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात बिनबुडाच्या तक्रारी करण्याचा लोकप्रतिनिधीने सपाटा लावला आहे.लोकवर्गणीतुन
पढेगावच्या पोलीस चौकीचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला. तर लोकप्रतिनिधी यांनी शासनाचा निधी शिल्लक असताना भिक कशाला मागता असा खोचक सवाल लोकप्रतिनिधी कानडे हे करत आहे. निधी शिल्लक होता तर वर्षभरात पोलिस चौकीचे काम का केले नाही. वर्षभरात एकही रुपयाचे नवीन काम न करणारा लोकप्रतिनिधी कोरोना संकटात पोलीस चौकीसाठी निधी देणार कधी ? चौकी बांधणार कधी ? याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याचे जगजाहीर असल्याने लोकवर्गणीतून चौकी बांधल्याने लोकप्रतिनिधीला दु;ख होण्याचे काहीच कारण नाही. चांगल्या अधिकारींना बदनाम करून मर्जीतील अधिकारी आणून इतिहासात केलेले घोटाळे पुन्हा सुरु करायचे का ?
जेव्हा पोलीस उपाशी राहून कोरोना संकटात काम करत होते तेव्हा हे लोकप्रतिनिधी अलिशान रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.असा आरोप भाजप भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस खेमनर यांनी केली आहे
बिनकामाच्या आमदाराला लोकवर्गणीची आडचण